श्री. विश्वकर्मा मय पांचाल समाज मंडळ, अकोला

रजि. नं. एफ ७६१/८१
श्री. विश्वकर्मा मय सभागृह, विश्वकर्मा नगर, मोठी उमरी, अकोला.

Vishwakarma Mandir, Akola

   विश्वकर्मा वंशीय सुतार समाजात ऐक्य घडवून आणून त्यांना शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक (औद्योगिक व सांस्कृतिक) विकासाची संधी प्राप्त करून समाजाचा आर्थिक स्तर उंचावणे या उदात्त हेतूने श्री विश्वकर्मा मय पांचाळ समाज मंडळाची स्थापना दि. २८/६/१९८१ रोजी करण्यात आली. अत्यंत विपरीत परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या समाजातील गणमान्य समाज बांधवांनी या मंडळाची स्थापना केली. मंडळाची स्थापना करण्यात संस्थेचे प्रथम अध्यक्ष श्री. वामनराव राजहंस यांनी व श्री. दामोदर अंजनकर, श्री. माणिकराव पुनकर, श्री. केशवराव वडतकर, श्री. बळीराम उमरकर, श्री. तुळशीरामजी पांडे, श्री. मधुकर तऱ्हाळकर, श्री. शालीकराम बारोकर, श्रीमती. शकुंतलाबाई ओरीवकर, श्री. अनंतराव वडतकर, श्री. जनार्दन बाळापुरे, श्री. विष्णू चांदुरकर, श्री. गंगाराम तऱ्हाळकर, श्री. किसन पन्हाळकर, श्री. बाळकृष्ण जानोरकर, श्री. नारायण नानोटकर, श्री. नारायण ताटस्कर इ. मंडळीनी पुढाकार घेऊन ह्या मंडळाची स्थापना केली. त्यात सक्रीय सेवाधारी १७ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. समाजासाठी प्रभू विश्वकर्माचे मंदिर मंदिर असावे असा विचार मंडळापुढे आला. त्यादृष्टीने मंडळाने श्री. विश्वकर्मा मंदिराकरिता जागा प्राप्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले. विश्वकर्मा नगर मधील श्री. पळसपगार रा. उमरी ह्यांच्या मालकीच्या ३३ x ९९ फुट आकाराच्या खाली प्लॉट मध्ये ७ एप्रिल १९८१ रोजी श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिराचे तात्पुरते बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सदर जागा मंडळाने खरेदी करण्याचे ठरविले. त्यासाठी लागणारा निधी देणगी, अनुदान, चॅरीटी कार्यक्रमाचे आयोजन करून गोळा करण्याचे ठरले. त्यानुसार संबंध सुतार समाज बांधव तथा अन्य समाज बंधू, सॅामिल मालक, फर्निचर दुकानदार, कारखानदार इ. असंख्य समाज सेवेची चाड असलेल्या व्यक्तींनी उदार मनाने आर्थिक मदत केल्यामुळे जागा खरेदीचा प्रश्न सुटला व दि. ३१/१२/१९८१ रोजी विश्वकर्मा नगरमध्ये जुनी नियोजित जागा खरेदी करण्यात आली. त्यानंतर दि. ७/२/८२ रोजी पहिला श्री. विश्वकर्मा जयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. तसेच मंदिराचे पक्के बांधकामासाठी निधी उभा करण्याकरिता संस्थेच्या कार्यकारी मंडळाकडून देणग्या घेण्यात आल्या तसेच इतर समाज बांध्वान्कडून देणग्या, वर्गणी गोळा करण्यात आली. मंदिर व सभागृह बांधकामाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्यात आले. वरील प्रमाणे निधी उभारण्यासाठी श्रीमती. प्रमिलाताई दातार प्रस्तुत "सुनहरी यादे" महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा ह्या कार्यक्रमाचे आयोजन अकोला व मंगळूरपीर येथे करण्यात आले. तथापि सदर कार्यक्रमसुद्धा फारसे फायदेशीर ठरले नाहीत. त्यामुळे पाहिजे तेवढा निधी प्राप्त होऊ शकला नाही. समाजातील दानशूर व्यक्तींकडून वर्गणी घेवून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.ह्या काळात मंदिराचे व सभागृहाचे बांधकामाचे भरपूर प्रयत्न करण्यात आलेत.बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती परंतु पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळे मंदिराचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरु होते. जवळपास २५ वर्षांचा कालावधी यामध्ये निघून गेला. दि. ९ जानेवारी २००६ रोजी कार्यकारी मंडळातील सदस्य सभागृहाचे बांधकामासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी फिरत असतांना समाजातील श्री. किशोर फुलकर यांच्याशी भेट झाली. श्री. फुलकर यांनी सभागृहाच्या बांधकामासाठी निधी कशा प्रकारे उभा करता येईल या बाबत माहिती दिली. श्री. फुलकरांच्या प्रेरणेमुळे कार्यकारिणीत एक उत्साह संचारला आणि त्यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ते निधी गोळा करण्याच्या कामात सक्रीय झालेत आणि त्याप्रमाणे वर्गणी गोळा करण्यात आली व एका वर्षात सभागृहाचे स्लेबसह काम पूर्ण करण्यात आले. समाजबांधवांनी दिलेल्या उत्कृष्ट सहकार्यामुळे एवढे मोठे भव्यदिव्य वास्तूचे बांधकाम पूर्णत्वास येवू शकले. समाजातील सर्व समाजबांधवांनी जस जसे शक्य होईल तश्या रक्कमेची देणगी ह्या बांधकामासाठी दिलेली आहे. तसेच सामाजाव्यातिरिक्त इतर समाजाकडून बाहेरून मोठ्या प्रमाणात देणगी प्राप्त झाली आहे. सभागृहाच्या बांधकामाकरिता रेती, गिट्टी व सिमेंट इ. बांधकाम सामग्री पुरवून साभागृहामध्ये कोटा फिटिंगसह बसवून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती श्री. विलासराव लाडेकर यांचे मोठे योगदान लाभले आहे. अशा रीतीने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कर्तव्य भावनेतून सर्व समाजबांधवांनी आर्थिक सहकार्य करून एका भव्य दिव्य सभागृहाची निर्मिती झाली आहे.

मंडळाच्या स्थापनेपासून दरवर्षी श्री. विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. दि. ३१/१/२००७ रोजी सभागृहाचे बांधकाम चालू असतांना २७ वी विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. त्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंडळातर्फे वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात आले. यात समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार, विविध बाल स्पर्धा यामध्ये रांगोळी स्पर्धा (मुलींकरिता), चित्रकला, हस्ताक्षर, निबंध, सामान्य ज्ञान स्पर्धा, शास्त्रीय नृत्य आणि सुगम संगीताचा कार्यक्रम घेण्यात आले. मंडळातर्फे हस्तकला प्रदर्शन व ल्घुउध्योग मार्गदर्शन, महिला मेळावा, महिला बचत गटांची स्थापना करणे, नेत्र तपासणी शिबीर असे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.

सभागृहाचे दुसर्या मजल्याचे बांधकाम लोखंडी कैच्या व टिन पत्रे टाकून करण्यात आले आहे. तसेच फ्लोरिंग साठी सिरामिक टाईल्स बसविण्यात आले आहेत यासाठी श्री. राजेशजी लाखेकर नागपूर यांनी योगदान दिले आहे.याकारणास्तव निधी उभारण्यासाठी समाजातील व्यक्तींकडून ठेवी स्वीकारण्यात आल्या व सदर ठेवी ठेवीदारांना परत सुद्धा करण्यात आलेल्या आहेत.

सद्यस्थितीत सभागृहाचे दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झालेले असून सदर सभागृहाचा उपभोग समाजातील गरजू व्यक्ती विविध कार्यक्रमा साठी घेत आहेत.

सभागृहाचे दोन मजली बांधकाम पूर्ण झाल्यामुळे व मंदिराचे बांधकाम जुनेच असल्यामुळे मंदिराच्या जीर्नोधाराचे काम करणे आवश्यक आहे व त्या दृष्टीने सदर कामाचा आराखडा व अंदाज पत्रक तज्ञांकडुन करून घेण्याचे नियोजित आहे व सदर कामासाठी अंदाजे १५ ते २० लक्ष रु. निधीची आवश्यकता आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन संस्थेच्या कार्यकारी मंडळाकडून करण्यात आले आहे. प्रभू श्री. विश्वकार्माची संगमरवरी मूर्ती नागपूर येथील श्री. राजेशजी लाखेकर यांनी मंडळास भेट दिली आहे.

संस्थेचे ध्येय व उधिष्ट


१. विश्वकर्मा वंशीय पांचाल सुतार समाजातील ऐक्य घडवून आणणे, व त्यांना शेक्षणिक, सामाजिक, व आर्थिक, ओद्योगिक व सांस्कृतिक विकासाची संधी प्राप्त करून देणे व आर्थिक मदत करणे, व त्यात पांचाल समाज सुतार समजा व्यतिरिक्त इतर समाज हस्तक्षेप करणार नाही कारण निर्मिती हि पांचाल सुतार समाजानेच केली आहे.

२. संस्थेंतर्गत ओद्योगिक शिक्षण संस्था निर्माण करून पांचाल सुतार समाजातील मुला-मुलीना स्वयंरोजगाराची संधी प्राप्त करून देणे.

३. सांस्कृतिक व सामाजिक विकास साधण्यासाठी संस्कार केंद्रे स्थापने, शिबीर भरविणे, सांस्कृतिक कार्यक्रम हाती घेणे व मंगल काराल्याची स्थापना करणे.

४. पांचाल सुतार समाजातील गरीब पण होतकरू विध्यार्थी यांना शेक्षणिक शिष्यावृत्ती देणे.

५. पांचाल सुतार समाजातील अनावश्यक चालीरीती व अंधश्रद्धा ह्याला आळा घालणे.

६. विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा करणे, संस्थेच्या अंतर्गत बालवाडी, बाल मंदिर, व वाचनालय सारख्या चालविणे इ.

७. भव्य स्वरूपात विश्वकर्मा प्रभूंच्या मंदिराची उभारणी करून देखभाल करणे.

८. पांचाल सुतार समाजातील सामुहिक विवाह घडवून आणणे व पार पाडणे, आर्थिक दुर्बल असणार्या मुला-मुलींचा विवाह संस्थेच्या खर्चाने करणे.

९. आरोग्यविषयक सोयी उपलब्ध करून देणे.

१०. समाज विकासाकरिता राष्ट्रीय कार्यात सहभागी होणे.

११. पांचाल सुतार समाजातील विध्यार्थी ह्यांना राहण्याकरिता वसतिगृहाची स्थापना करणे.

१२. संस्थेला आवश्यक वाटल्यास जागेची खरेदी करणे.

१३. मंगल कार्यालयात आवश्यक सोयी करणे.

१४. पांचाल सुतार समाजातील आर्थिक अति दुर्बल असणार्यांना आर्थिक मदत करणे, व त्याकरिता आव्स्यक्तेनुसार फंड उभारणे.

१५. हुंडाबळी विरुद्ध लढा देणे.