श्री. विश्वकर्मा मय पांचाल समाज मंडळ, अकोला

रजि. नं. एफ ७६१/८१
श्री. विश्वकर्मा मय सभागृह, विश्वकर्मा नगर, मोठी उमरी, अकोला.

Vishwakarma Mandir, Akola

    विश्वकर्मा वंशीय सुतार समाजात ऐक्य घडवून आणून त्यांना शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाची संधी प्राप्त करून देण्यासाठी श्री विश्वकर्मा मय पांचाळ समाज मंडळाची स्थापना दि. २८/६/१९८१ रोजी अकोला शहरातील मोठी उमरी येथे विश्वकर्मा नगरात करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वामनराव राजहंस यांनी व श्री. दामोदर अंजनकर, श्री. माणिकराव पुनकर, श्री. केशवराव वडतकर, श्री. बळीराम उमरकर, श्री. तुळशीरामजी पांडे, श्री. मधुकर तऱ्हाळकर, श्री. शालीकराम बारोकर इ. गणमान्य मंडळीनी पुढाकार घेऊन ह्या मंडळाची स्थापना केली.

    ह्या संस्थेमार्फत प्रभू श्री. विश्वकर्मा मंदिराच्या बांधकामासाठी ३३x९९ फुट आकाराचा प्लॉट खरेदी करण्यात आला व त्या जागेवर प्रभू श्री. विश्वकार्माच्या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. समाज बांधवांकडून वर्गणी / देणगी स्वरूपात मिळालेल्या निधीच्या उपलब्धतेनुसार या जागेवर भव्य दिव्य असे दोन मजली सभागृह बांधण्यात आले आहे. संस्थेच्या स्थापनेपासून दरवर्षी श्री. विश्वकर्मा जयंती उत्सव थाटामाटात साजरा करण्यात येतो.

    तसेच संस्थेमार्फत वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येतात जसे समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचा व सेवा निवृत्त समाजबांधवांचा सत्कार, महिला बचत गटाची स्थापना, हस्तकला प्रदर्शन व लघु उद्योग मार्गदर्शन, महिला मेळावा, नेत्र तपासणी शिबीर, लहान मुलांसाठी विविध बाल स्पर्धा जसे चित्रकला, हस्ताक्षर, निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, मुलींकरिता रांगोळी स्पर्धा इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

    सद्यस्थितीत सभागृहाचे दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून समाजबांधव सदर सभागृहाचा उपभोग घेत आहेत.

    मंदिराचे बांधकाम सभागृहाच्या बांधकामाच्या आधीच झालेले असल्यामुळे मंदिराच्या कळसाची उंची सभागृहापेक्षा कमी आहे. त्यामुळे मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सदर कामाचा आराखडा व अंदाजपत्रक तज्ञानकडुन करून घेण्याचे नियोजित आहे. सदर कामासाठी अंदाजे १५ ते २० लक्ष रु. निधीची आवश्यकता आहे यासाठी समाजबांधवांनी सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन संस्थेच्या कार्यकारी मंडळाकडून करण्यात आले आहे.